मनाला निर्मळ करायचे असेल तर ध्यानसाधना आवश्यक करा……. भिक्कु रेवत
मनाला निर्मळ करायचे असेल तर ध्यानसाधना आवश्यक करा....... भिक्कु रेवत (प्रबुद्ध भारत टीम) :- सावरगाव हडप येथील संघमित्रा बुद्ध विहारात आज दिनांक 17/8/2021 रोजी सकाळी 7:00 वा घेण्यात आलेल्या अनापानसती (ध्यानसाधना) या कार्यक्रमापुर्वी भिक्कु रेवत म्हणाले की आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी ध्यान एकाग्र चित्ताने करणे आवश्यक आहे त्यांच्यामुळे मनातील येणाऱ्या वाईट विचारांना थारा मिळणार नाही मन सकारात्मक विचार करायला लागेल म्हणून मन शांत व शिस्तबद्ध करण्याचा अनापानसती हाच एकमेव पर्याय म्हणून उपासक उपासिका यांनी केला पाहिजे. भिक्कु रेवत यांच्या या सकाळी 7 वा बुद्ध वंदना झाल्यानंतर अनापानसती व संध्याकाळी 8 वा बुद्ध वंदना घेऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन अशा उपक्रमात गावातील उपासक उपासिका व बाल बालिका मोठ्या संख्येने हजर राहून या अनोख्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असून एक बौद्ध धम्माचे शांततेचे वातावरण तयार झाले आहे. याच निमित्ताने प्रत्येक दिवशी एका कुटुंबाला बुद्ध धम्माची पुजा विधी करण्याचा मान सन्मान मिळत असल्याने प्रत्येक कुटुंब स्वाभिमानाने आपल्या इच्छेनुसार भिक्कु रेवत यांच्यासह भिक्कु संघाला सकाळी भोजनदान व संध्याकाळी बुद्ध विहारातील प्रत्येकांना प्रसाद म्हणून वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी देण्याची एक सुंदर पद्धत सुरू झाल्याने येणारी पिढी ( बाल बालक) मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात व मेजवानी सह कार्यक्रमाचा लाभ घेतात.अशा या रोजच्या भिक्कु रेवत यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कार्यक्रमास उपस्थिती हाँल गच्च भरून मिळत असल्याने भिक्कु रेवत यांना त्याचा आनंद व कार्य करण्यास हुरूप येत आहे.यावेळी भिक्कु रेवत सह सावरगाव हडप येथील बौद्ध उपासक उपासिका व बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.